बसपा उमेदवाराच्या गाडीतून १ लाख रुपये जप्त
No icon

गोंदिया जिल्ह्यात ७८ लाख रुपये जप्त

बसपा उमेदवाराच्या गाडीतून १ लाख रुपये जप्त

गोंदिया, दि. 31: - गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघातील बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष आघाडीच्या उमेदवार डॉ. विजया राजेश नंदुरकर (ठाकरे) या आज रविवार ला प्रचारा निमित्त गोंदिया ला येत असतांना त्यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. तसेच उमेदवार डॉ. विजया नंदुरकर यांच्या कडे असलेल्या हँडबग मध्ये १ लाख रुपयाची रोखड मिळाल्याने त्या रकमेबद्दल ठोस पुरावे न सादर केल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली ही कारवाई मंडळ अधिकारी बळीराम भेंडारकर यांच्या पथकाने केली. कारंजा पोलीस मुख्यालयासमोर वाहनाची तपासणी करण्यात आली.

त्यावेळी उमेदवाराकडून सदर रकमेबद्दल पुरावे सादर करण्यात न आल्याने ती रक्कम जप्त करण्याची कारवाई करीत असताना गोंदिया जिल्हा बसपा प्रमुख पंकज यादव, दुर्वास भोयर यांनी तिथे येऊन शासकीय कार्यात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्या विरुध्द गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोबतच तिरोडा येथील चंद्रभागा नाका येथील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालयासमोर इंडिका कार एमएच ३५ पी ४८११ मध्ये रोख रक्कम असल्याची माहिती मिळताच नायब तहसिलदार व्हनकडे यांच्यासह सहायक पोलीस निरिक्षक कैलास गवते यांनी घटनास्थळी पोहाचुन वाहनाची तपासणी केली असता मागच्या सीटवर एका पिशवीत, टिनाच्या पेटीत तसेच कारच्या मागच्या डिक्कीत एका पिशवी मध्ये ७७ लाख रुपयाची रोख रक्कम मिळाली.सदर रक्कमेबद्दल कारमध्ये असलेले लेखापाल आकाश मनोहर वालदे, गाडी चालक देवेंद्र पालादूंरकर यांना विचारणा केली असता त्यांनी योग्य उत्तर न दिल्याने तसेच कागदपत्र सादर न केल्याने ती रक्कम जप्त करुन आयकर विभाग तसेच जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे.

Comment As:

Comment (0)